Friday, 10 July 2020

शनिवार दि. ४/७/२०२०


🌹🌹   नमस्कार  🌹🌹
★  पालक समिती बैठक वृत्त ★

शनिवार दि. ४/७/२०२० रोजी सायंकाळी ६ वाजता नियोजित बैठक सुरू झाली. प्रस्तावना सौ. स्मिता ताईंनी केली. सर्वांचे स्वागत करून, बैठकीच्या सूचना दिल्या.
      सौ. मीनाताईंनी पालक महासंघाच्या कार्यकारिणीचे नवीन अध्यक्ष श्री. मिलिंद दादा यांचे अभिनंदन केले, तसेच सौ. मेधा ताईंचे ब्लॉग्स बद्दल कौतुक केले. यानंतर ताईंनी पालक समितीचे उद्दिष्टे सदस्यांसमोर मांडली. ब्लॉग्स बद्दल माहिती देताना पालकांना मदतीचे आवाहन केले.
    सौ. मीनाताईंनी ईटेक यंत्रणेबद्दल माहिती देत, त्यावर शिक्षक अजूनही काम करीत असल्याची माहिती दिली.
शुल्क भरणे याबद्दल आढावा देताना ताईंनी ज्या पालकांनी शुल्क भरण्यास इतर पालकांना मदत केली त्यांचे विशेष कौतुक केले व आभार मानले.
     त्यानंतर शासकीय समितीसाठी इच्छुक पालकांना आवाहन केले. त्यानंतर जुलै महिन्यात झालेल्या आषाढी एकादशी कार्यक्रमाबद्दल सदस्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या.
    तसेच आपापल्या वर्गाचा आढावा प्रत्येक सदस्यांकडून घेण्यात आला. नंतर १ ली व २  री चे वेळापत्रक एक दिवसाआड घेण्यात यावे, असे सर्वानुमते ठरले. समिती सदस्यांचे शंकानिरसन होऊन चर्चा करण्यात आली.
     उपस्थित सर्व पालकांचे आभार मानून , बैठकीचा समारोप करण्यात आला.

सर्वांचे मनापासून आभार....🙏🙏

वृत्तलेखिका -
सौ. भैरवी नाझरकर

No comments:

Post a Comment