पालक समिती बैठक मुद्दे
दि - १५/९/२०२० मंगळवार
वेळ - ६ ते ७
नमस्ते - श्री .नांदे सर
मागील बैठकीचा आढावा घेणे.
प्रस्तावना - सौ .स्मिताताई
१ ) पालकांची व मुलांची कार्यशाळा -
श्री .बिराजदार१०मि
२) गुगल फॉर्म संकलन - श्री .कळसकर १ ० मि
३) कार्य संकल्प मांडणी व चर्चा-मा. मीनाताई १५ मि.
समारोप- मीनाताई
पालक समिती बैठक वृत्त
१) मंगळवार दिनांक १५/०९/२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता नियोजित बैठक सुरू झाली.
२) पालक बैठकीच्या सुरुवातीला श्री.नांदे सरांनी नमस्ते घेऊन मागील बैठकीचा आढावा घेतला व बैठकीची प्रस्तावना सौ.स्मिताताई यांनी केली.
३) यामध्ये आपल्याला पालकांची तसेच मुलांची कार्यशाळा घेता येईल का? आणि घेता येणार असेल तर कोणत्या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली पाहिजे यावर श्री.नांदे सर,सौ.स्मिताताई,सौ.मीनाताई आणि पालक प्रतिनिधींनी मिळून चर्चा केली.
४) या चर्चेमध्ये साधारणपणे अक्षर सुधारणे,निरीक्षण कौशल्य वाढवणे,पालक व मुले यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, आहार संतुलन व नियोजन,ऑनलाईन मॅनर्स एटी केट्स,ऑनलाईन मीटिंग साठी पालकांना मार्गदर्शन करणे असे विषय समोर आले.
५) त्यानंतर श्री.कळसकर दादांनी गुगल फॉर्म संकलन झाल्याचे सांगितले.त्यातील सदस्यांचा कल आरोग्य,कला,शिक्षण,क्रीडा यापैकी कोणत्या क्षेत्रात आहे ते विषयवार वर्गवारी करून सांगितले.
६) श्री.मिलिंद दादांनी शाळेच्या कामासाठी अजून प्रतिनिधींची आवश्यकता आहे त्यामुळे वर्गातून पालकांना मदतीसाठी आवाहन व्हावे असे म्हणाले.
७) सर्वात शेवटी सौ.मीनाताईंनी झालेल्या चर्चेवर थोडक्यात मते मांडली व प्राथमिकची कार्य संकल्पना या विषयी माहिती सांगितली. मीनाताई आणि शिक्षकांमध्ये झालेल्या कार्य संकल्प विषयी बैठकीचे मुद्दे मांडले.आणि सर्वात महत्त्वाचे सहामाही परीक्षा याविषयी थोडक्यात सूचना दिल्या,त्या अशा - १ ली व २ री तोंडी परीक्षा, ३ री व ४ थी ची तोंडी आणि लेखी स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. व परीक्षेनंतर शाळेला दिवाळीची सुट्टी असेल.
८) बैठकीचा समारोप सौ.मीनाताईंकडून झाला.
धन्यवाद!!
सौ.भाग्यश्री पाठक
No comments:
Post a Comment