ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय , निगडी.
प्राथमिक विभाग ( म. मा )
* पालक कार्यशाळा*
पालक-शिक्षक संघटन खात्याअंतर्गत पालक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.२६/९/२०२० शनिवार
वेळ - ६ ते ७
विषय:-सध्य परिस्थितीत ( कोरोना काळात ) अशी जपू यात मुलांची मने
********
मार्गदर्शक - सौ अपर्णा धनंजय कुलकर्णी
सहभागी गट- इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व पालक अध्यापक
घटक -
१)पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन कसे वागावे याच्या भूमिका स्पष्ट करणे.
२) प्रश्नोत्तरे - १०मि .
३) समारोप - ५ मि.
( मा. मीनाताई दीक्षित )
एकूण . वेळ - एक तास ( कार्यशाळा )
या कार्यक्रमाची झूम लिंक पाठविली जाईल.
Recording
वृत्तलेखन
शनिवार दिनांक २६/९/२०२० रोजी प्राथमिक मराठी विभागाच्या पालक - शिक्षक संघटन खात्याअंतर्गत विभागातील पालकांसाठी सद्य परिस्थितीत (कोरोना काळात) अशी जपुयात मुलांची मने. या विषयावरील एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पालकांशी संवाद साधण्यासाठी सौ. अपर्णा धनंजय कुलकर्णी या मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या.
कार्यशाळेची सुरुवात नांदे सरांनी वंदन घेऊन केली. नंतर पालक समिती तर्फे होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती समितीचे सदस्य श्री.सचिन कळसकर यांनी दिली. पालक समिती सदस्या सौ.भैरवी नाझरकर यांनी अपर्णा ताईंचा परिचय करून दिला. अपर्णा ताईंनी कार्यशाळेची सुरुवात खूपच सहज व सोप्या भाषेत केली. सुरुवातीलाच ताईंनी मुलांना TV व पेपर मधील कोरोनाच्या बातम्यापासून मुलांना लांब ठेवण्याची विनंती केली. नंतर A,B,C व D ह्या चारसूत्राबाबत अपर्णा ताईंनी माहिती दिली. ताईंनी प्रामुख्याने मुलांचे मानसिक, शारीरिक आरोग्या बरोबरच आहार या विषयावर पालकांशी संवाद साधला. प्रथम मानसिक आरोग्य जपताना ताईंनी मुलांबरोबर करण्याचे अगदी सहज असे उपक्रम सुचवले. त्यात प्रामुख्याने मुलांशी संवाद साधणे, पत्र लेखन, सावरकरांच्या गोष्टी सांगणे व आपल्या संस्कृती ची जवळून ओळख करून देणे तसेच मुलांकडून विविध श्लोक पाठांतर करून तसेच विष्णू षोडश नाम स्तोत्र रोज म्हणून घेण्यावर भर दिला. नतंर, ताईंनी मानसीक आरोग्या बरोबरच शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मुलांकडून कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालून घेण्यासाठी आग्रह धरला , तसेच पौष्टिक आहार किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले. शेवटी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मिनाताई दीक्षित यांनी अपर्णा ताईंचे आभार मानले मुलांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा शाळेत येण्याचे आमंत्रण देखील अपर्णा ताईंना दिले. कार्यशाळेचा समारोप नांदे सरांनी केला.
वृत्त लेखन
सौ.सीमा दाणी
पालक समिती सदस्या

No comments:
Post a Comment