Monday, 3 August 2020

शनिवार दि. १/८/२०२०

🌹🌹  नमस्कार 🌹🌹
     पालक समिती बैठक वृत्त

➡️शनिवार दि. १/८/२०२० रोजी सायंकाळी ७.१५ वाजता नियोजित बैठक सुरू झाली.

➡️सुरुवातीला सौ.विद्याताईं आहेरकर यांनी निरामय योग प्रसारक,परभणी द्वारा आयोजित श्वसन योगाची माहिती दिली. यावेळी हा योगाभ्यास कोरोनाच्या विरुद्ध कसा प्रभावी आहे हे त्यांनी पटवून दिले. हे 3 दिवसीय(रोज 1 तास) शिबिर  मोफत असून सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी  त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

➡️यानंतर वर्गवार चालू असलेल्या अभ्यासक्रम व इतर उपक्रमांचा आढावा घेतला.

➡️दरम्यान पालक महासंघाचे अध्यक्ष श्री मिलिंद दादांनी पालक महासंघातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध खेळांमध्ये पालकांनी सहभाग घेण्यासाठीचे  आवाहन केले.

➡️पालक समिती सदस्यांना पालकसमितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सदस्यांची ओळख करून घेणे गरजेचे असते. या साठी श्री मिलिंद दादा, श्री अरुण मामा मरळ  व सचिन दादा यांच्या कडे पालक सदस्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली गेली.

➡️येत्या गणेशोत्सवात राबवता येण्यासारखे विविध उपक्रम सदस्यांनी सुचवले. यात ऑनलाइन अथर्वशीर्ष पठण, गणेशाची मूर्ती तयार करणे(ऐच्छिक) यासारख्या उपक्रमांचा समावेश होता.

➡️श्री माळी यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या समन्वयाची जबाबदारी श्री आनंद दादा यांनी स्वीकारली.

➡️विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकातील झालेला बदल सर्व सदस्यांना कळविण्यात आला. वेळपत्रकातील बदल खालीलप्रमाणे
इ .१ली २रीसाठी
३ ऑगस्टपासून आठवडयाच्या१०तासिकांची विभागणी अशी असेल .

१ )क्रमिक शिक्षण -३
२ )शा . शि-६
३ )सा .उपासना -१ ( एकत्रित १ली २री )

🎤दर आठवड्यातला १ दिवस झूमवर १० मुलांशी गप्पा मारणे .

इ .३री४थीसाठी
३ ऑगस्टपासून आठवडयाच्या१८तासिकांची विभागणी अशी असेल .

१ )क्रमिक शिक्षण -८
२ )शा . शि-६
३ )सा .उपासना -१ ( एकत्रित ३री४थी )
४ )शिक्षकांचा संवाद -१
५ ) अभिव्यकती-२ ( गायन / मुक्तांगण )
🎤दर आठवड्यातला १ दिवस झूमवर १० मुलांशी गप्पा मारणे .

➡️१ली ते४थीच्या प्रत्येक वर्गातील मुलांचे ४ गट करण्यात येतील . वर्गशिक्षक आठवडयातून एका गटातील १०-१२ मुलांशी झूम वर ऑनलाईन येऊन वैयक्तिक गप्पा मारतील . प्रत्येक मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी असा संवाद दर आठवडयाला १ गट याप्रमाणे होईल

➡️बैठकीच्या शेवटी दररोज घेतल्या जाणाऱ्या योग वर्गात विद्यार्थ्यांचा व पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे ठरले
                     
धन्यवाद
श्री.आनंद बिराजदार

No comments:

Post a Comment