Wednesday 30 September 2020

वर्गश:पालकबैठक क्र -3

 *वर्गश:पालकबैठक क्र -3
 दि.11जुलै 2020 शनिवार
 वेळ -6 ते 7
 बैठकीचे मुद्दे -
1)मागील बैठकीचा आढावा .

2)उपक्रमलेखन आढावा
 -3री              व 4थी
 
3)गुरुपौर्णिमा कार्यक्रम-स्वरुप सांगणे .
 
4)सदगुण कथा याविषयी बोलणे .

5)वर्गाचे काही वेगळे प्रश्न ,अडचणी

6)ई-टेक विषयी माहिती सांगणे .

7)शुल्क आढावा ..विभागातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आवाहन..

8)पालकप्रतिनिधीनी वर्गअध्यापकांना कशी मदत करावी  ,त्याचे स्वरुप. पुढीलप्रमाणे....blog कामासंदर्भात,online फी भरण्याबाबत मदत करणे..
 
.9)पालकांशी मुक्त संवाद -ऑनलाईन शिक्षणासंदर्भात

वर्गश :पालकबैठक क्र -5

 *वर्गश :पालकबैठक क्र -5
 शनिवार ,दि -25 जुलै
 वेळ -6 ते 7
 बैठकीचे मुद्दे -


 1) ई -टेक सूचना - घ .अभ्यास

2) स्वराज माळीसाठी आवाहन ..

3) आर्थिक अडचण असणाऱ्या मुलांचे शै.शुल्क साठी आवाहन ..

4) शाळेतर्फे नांदे sir  योगासने आणि  व्यायामप्रकार घेत आहेत.पाल्याला उपस्थित राहण्यास सांगणे..पालक देखील जॉईन होऊ शकतात..यासाठी आवाहन करणे..

5) मुलांशी व्यक्तिगत संवाद..

6) आपले स्वतःच्या वर्गाला अनुसरण काही मुद्दे..
 
7) पालकांचे प्रश्न ,अडचणी..
 
8) ऑनलाइन शिक्षण सर्व विषय याबाबत पालकांशी बोलून आढावा घेणे...

9) सद्ग गुणांवर  आधारित कथा याबाबत पा लकांकडून आढावा घेणे..

10) सह्याद्री वाहिनीवर टीली मिली कार्यक्रम ..आढावा घेणे.

11) संध्याकाळी घरात दिवा लावून पाठांतर भाग म्हणा..असे सांगणे..

बैठक वृत्त - 9_सप्टेंबर_२०२०

 9/9 रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी  मीनाताई यांनी सुचवलेले मुद्दे

पालक समिती कार्य संकल्प
✅गट श: पालक- कार्यशाळा-पालक प्रतिनिधी खातेप्रमुख यांच्या मदतीने काम पाहतील.
यात विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी कार्यशाळा घेणे
इयत्ता पहिली दुसरी शिक्षणाची गोडी वाढावी तसेच  तिसरी चौथी कौशल्यांचा विकास या विषयांवर कार्यशाळा व्हाव्यात.
✅कृतीयुक्त सहभाग-
वर्गमित्र रचनांमधून अधिकाधिक पालकांना समजावून घेण्याचा प्रयत्न करणे
✅ जबाबदारी-
 अनुभव शिक्षकांची जबाबदारी खातेप्रमुख यांच्या आधारे
घेतील
✅ पालकांच्या ज्ञानाचा उपयोग प्राथमिक विभागाच्या खातेराचनेत करून घेणे.
✅ तसेच प् अध्यापनात उपयोग करून घेणे
✅ प्रत्येक वर्गातील पाच पालक वर्षाच्या शेवटपर्यंत पालक महासंघाला जोडून देणे.
✅ पालक गुगल फॉर्म तयार करणे आणि वर्ग अध्यापकांना पुढच्या वर्षी माहिती  handover करावे.
⭐  पालक कार्यशाळा सप्टेंबर मध्ये घेता येतील का
⭐ कोविड काळात विद्यार्थ्यांना कसे हाताळावे यासाठी कार्यशाळा असा एक विषय सुचवले ला आहे पालकांनी

बैठक वृत्त - १५_सप्टेंबर_२०२०

 पालक समिती बैठक मुद्दे

 दि - १५/९/२०२० मंगळवार
 वेळ - ६ ते ७
 नमस्ते - श्री .नांदे सर
मागील बैठकीचा आढावा घेणे.
प्रस्तावना -  सौ .स्मिताताई
१ ) पालकांची व मुलांची कार्यशाळा -  
श्री .बिराजदार१०मि
२) गुगल फॉर्म संकलन - श्री .कळसकर १ ० मि
३) कार्य संकल्प मांडणी  व चर्चा-मा. मीनाताई १५ मि.
    समारोप- मीनाताई

 

पालक समिती बैठक वृत्त

१) मंगळवार दिनांक १५/०९/२० रोजी सायंकाळी ६.०० वाजता नियोजित बैठक सुरू झाली.
२) पालक बैठकीच्या सुरुवातीला श्री.नांदे सरांनी नमस्ते घेऊन मागील बैठकीचा आढावा घेतला व बैठकीची प्रस्तावना सौ.स्मिताताई यांनी केली.
३) यामध्ये आपल्याला पालकांची तसेच मुलांची कार्यशाळा घेता येईल का? आणि घेता येणार असेल तर कोणत्या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली पाहिजे यावर श्री.नांदे सर,सौ.स्मिताताई,सौ.मीनाताई आणि पालक प्रतिनिधींनी मिळून चर्चा केली.
४) या चर्चेमध्ये साधारणपणे अक्षर सुधारणे,निरीक्षण कौशल्य वाढवणे,पालक व मुले यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, आहार संतुलन व नियोजन,ऑनलाईन मॅनर्स एटी केट्स,ऑनलाईन मीटिंग साठी पालकांना मार्गदर्शन करणे असे विषय समोर आले.
५) त्यानंतर श्री.कळसकर दादांनी गुगल फॉर्म संकलन झाल्याचे सांगितले.त्यातील सदस्यांचा कल आरोग्य,कला,शिक्षण,क्रीडा यापैकी कोणत्या क्षेत्रात आहे ते विषयवार वर्गवारी करून सांगितले.
६) श्री.मिलिंद दादांनी शाळेच्या कामासाठी अजून प्रतिनिधींची आवश्यकता आहे त्यामुळे वर्गातून पालकांना मदतीसाठी आवाहन व्हावे असे म्हणाले.
७) सर्वात शेवटी सौ.मीनाताईंनी झालेल्या चर्चेवर थोडक्यात मते मांडली व प्राथमिकची कार्य संकल्पना या विषयी माहिती सांगितली. मीनाताई आणि शिक्षकांमध्ये झालेल्या कार्य संकल्प  विषयी बैठकीचे मुद्दे मांडले.आणि सर्वात महत्त्वाचे सहामाही परीक्षा याविषयी थोडक्यात सूचना दिल्या,त्या अशा - १ ली व २ री तोंडी परीक्षा, ३ री व ४ थी ची तोंडी आणि लेखी स्वरूपात परीक्षा घेतली जाणार आहे. व परीक्षेनंतर शाळेला दिवाळीची सुट्टी असेल.
८) बैठकीचा समारोप सौ.मीनाताईंकडून झाला.
धन्यवाद!!
सौ.भाग्यश्री पाठक

सध्य परिस्थितीत ( कोरोना काळात ) अशी जपू यात मुलांची मने

 


ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय , निगडी.
 प्राथमिक विभाग ( म. मा )
 * पालक कार्यशाळा*

पालक-शिक्षक संघटन खात्याअंतर्गत पालक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 दि.२६/९/२०२० शनिवार
 वेळ - ६ ते ७

विषय:-सध्य परिस्थितीत ( कोरोना काळात ) अशी जपू यात मुलांची मने
********
 मार्गदर्शक - सौ अपर्णा धनंजय कुलकर्णी

 सहभागी गट- इयत्ता पहिली ते चौथीचे सर्व पालक अध्यापक

 घटक -
१)पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेऊन कसे वागावे याच्या भूमिका स्पष्ट करणे.
२)  प्रश्नोत्तरे - १०मि .

३) समारोप - ५ मि.
       ( मा. मीनाताई दीक्षित )

 एकूण . वेळ -  एक तास ( कार्यशाळा )

या कार्यक्रमाची झूम लिंक पाठविली जाईल.

 

Recording 

 

वृत्तलेखन
 
शनिवार दिनांक २६/९/२०२० रोजी प्राथमिक मराठी विभागाच्या पालक - शिक्षक संघटन खात्याअंतर्गत विभागातील पालकांसाठी सद्य परिस्थितीत (कोरोना काळात) अशी जपुयात मुलांची मने. या विषयावरील एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  पालकांशी संवाद साधण्यासाठी सौ. अपर्णा धनंजय कुलकर्णी या मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या.

कार्यशाळेची सुरुवात नांदे सरांनी वंदन घेऊन केली. नंतर पालक समिती तर्फे होणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती समितीचे सदस्य श्री.सचिन कळसकर यांनी दिली. पालक समिती सदस्या सौ.भैरवी  नाझरकर यांनी अपर्णा ताईंचा परिचय करून दिला. अपर्णा ताईंनी कार्यशाळेची सुरुवात खूपच सहज व सोप्या भाषेत केली. सुरुवातीलाच ताईंनी मुलांना TV व पेपर मधील कोरोनाच्या बातम्यापासून मुलांना लांब ठेवण्याची विनंती केली. नंतर  A,B,C व D ह्या चारसूत्राबाबत अपर्णा ताईंनी माहिती दिली. ताईंनी प्रामुख्याने मुलांचे मानसिक, शारीरिक आरोग्या बरोबरच आहार या  विषयावर पालकांशी संवाद साधला. प्रथम मानसिक आरोग्य जपताना ताईंनी मुलांबरोबर करण्याचे अगदी सहज असे उपक्रम सुचवले. त्यात प्रामुख्याने मुलांशी संवाद साधणे, पत्र लेखन, सावरकरांच्या गोष्टी सांगणे व आपल्या संस्कृती ची जवळून ओळख करून देणे तसेच मुलांकडून विविध श्लोक पाठांतर करून तसेच विष्णू षोडश नाम स्तोत्र रोज म्हणून घेण्यावर भर दिला. नतंर, ताईंनी मानसीक आरोग्या बरोबरच शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी मुलांकडून कमीत कमी 12 सूर्यनमस्कार घालून घेण्यासाठी आग्रह धरला , तसेच पौष्टिक आहार किती महत्त्वाचा आहे हे समजावून सांगितले.  शेवटी विभागाच्या मुख्याध्यापिका  सौ.मिनाताई दीक्षित यांनी अपर्णा ताईंचे आभार मानले  मुलांशी संवाद साधण्यासाठी पुन्हा शाळेत येण्याचे आमंत्रण देखील अपर्णा ताईंना दिले.  कार्यशाळेचा समारोप नांदे सरांनी केला.

वृत्त लेखन
सौ.सीमा दाणी
पालक समिती सदस्या

Monday 3 August 2020

शनिवार दि. १/८/२०२०

🌹🌹  नमस्कार 🌹🌹
     पालक समिती बैठक वृत्त

➡️शनिवार दि. १/८/२०२० रोजी सायंकाळी ७.१५ वाजता नियोजित बैठक सुरू झाली.

➡️सुरुवातीला सौ.विद्याताईं आहेरकर यांनी निरामय योग प्रसारक,परभणी द्वारा आयोजित श्वसन योगाची माहिती दिली. यावेळी हा योगाभ्यास कोरोनाच्या विरुद्ध कसा प्रभावी आहे हे त्यांनी पटवून दिले. हे 3 दिवसीय(रोज 1 तास) शिबिर  मोफत असून सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी  त्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

➡️यानंतर वर्गवार चालू असलेल्या अभ्यासक्रम व इतर उपक्रमांचा आढावा घेतला.

➡️दरम्यान पालक महासंघाचे अध्यक्ष श्री मिलिंद दादांनी पालक महासंघातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध खेळांमध्ये पालकांनी सहभाग घेण्यासाठीचे  आवाहन केले.

➡️पालक समिती सदस्यांना पालकसमितीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सदस्यांची ओळख करून घेणे गरजेचे असते. या साठी श्री मिलिंद दादा, श्री अरुण मामा मरळ  व सचिन दादा यांच्या कडे पालक सदस्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली गेली.

➡️येत्या गणेशोत्सवात राबवता येण्यासारखे विविध उपक्रम सदस्यांनी सुचवले. यात ऑनलाइन अथर्वशीर्ष पठण, गणेशाची मूर्ती तयार करणे(ऐच्छिक) यासारख्या उपक्रमांचा समावेश होता.

➡️श्री माळी यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीच्या समन्वयाची जबाबदारी श्री आनंद दादा यांनी स्वीकारली.

➡️विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकातील झालेला बदल सर्व सदस्यांना कळविण्यात आला. वेळपत्रकातील बदल खालीलप्रमाणे
इ .१ली २रीसाठी
३ ऑगस्टपासून आठवडयाच्या१०तासिकांची विभागणी अशी असेल .

१ )क्रमिक शिक्षण -३
२ )शा . शि-६
३ )सा .उपासना -१ ( एकत्रित १ली २री )

🎤दर आठवड्यातला १ दिवस झूमवर १० मुलांशी गप्पा मारणे .

इ .३री४थीसाठी
३ ऑगस्टपासून आठवडयाच्या१८तासिकांची विभागणी अशी असेल .

१ )क्रमिक शिक्षण -८
२ )शा . शि-६
३ )सा .उपासना -१ ( एकत्रित ३री४थी )
४ )शिक्षकांचा संवाद -१
५ ) अभिव्यकती-२ ( गायन / मुक्तांगण )
🎤दर आठवड्यातला १ दिवस झूमवर १० मुलांशी गप्पा मारणे .

➡️१ली ते४थीच्या प्रत्येक वर्गातील मुलांचे ४ गट करण्यात येतील . वर्गशिक्षक आठवडयातून एका गटातील १०-१२ मुलांशी झूम वर ऑनलाईन येऊन वैयक्तिक गप्पा मारतील . प्रत्येक मुलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी असा संवाद दर आठवडयाला १ गट याप्रमाणे होईल

➡️बैठकीच्या शेवटी दररोज घेतल्या जाणाऱ्या योग वर्गात विद्यार्थ्यांचा व पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी सदस्यांनी प्रयत्न करावे असे ठरले
                     
धन्यवाद
श्री.आनंद बिराजदार

Wednesday 22 July 2020

शनिवार दि. १८/७/२०२०

पालक समिती बैठकीचे स्वरुप मुद्दे
🎍नमस्ते -
🎍प्रस्तावना परिचय
🎍१) पालक महासंघ उद्दिष्टे
🎍२) या वर्षीचे पालक महासंघाचे    उपक्रम व कार्यवाही स्वरूप.
🎍३) प्राथमिक मराठी विभागातील पालक प्रतिनिधी समिती चा कसा सहभाग पालक महासंघाच्या उपक्रमात अपेक्षित आहे.
🎍४) नवीन काही चांगले पालक शिक्षक व प्रतिनिधींच्या मदतीने पालक महासंघाला जोडणे.
🎍५ ) समारोप - मीनाताई
🎍नमस्ते -


🌹🌹  नमस्कार 🌹🌹
     पालक समिती बैठक वृत्त

शनिवार दि. १८/७/२०२० रोजी सायंकाळी ७.१५ वाजता नियोजित बैठक सुरू झाली. सुरुवातीला सौ.राजश्री ताईंनी पालक महासंघाची ओळख करून दिली. त्यात वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती तसेच गणेशोत्सव, क्रीडामहोत्सव यांची माहिती सांगितली.
      त्यानंतर सौ. चारूता ताईंनी पालक समिती सदस्यांची कामे यावर मार्गदर्शन केले.  तसेच चालू उपक्रमांबद्दल व झालेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली, त्यात श्रावणधारा, सखी प्रबोधिनी, व्याख्यानमाला याबद्दल आढावा दिला.
     श्री. मिलिंद दादांनी प्रथम पालक महासंघ विभाग रचना सांगितली. त्यानंतर महासंघाचे उपक्रम व कार्यसंकल्प याविषयी संकल्पना मांडली. पालक समिती सदस्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या,त्यात त्यांनी सांगितले की, समिती सदस्यांनी सर्व पालकांपर्यंत पालक महासंघ , त्यांचे उपक्रम पोचवले पाहिजेत.
      श्री. आनंद दादांनी योगप्रशिक्षण याबद्दल माहिती दिली. सौ. मीना ताईंनी समारोपात सौ. राजश्री ताई,
श्री. मिलिंद दादा, सौ. चारुता ताई यांचे आभार मानले.  त्यानंतर त्यांनी सर्व सदस्यांना उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले, तसेच माळी कुटुंबासाठी शक्य तेवढी आर्थिक मदत करायचे आवाहन केले, आणि बैठकीचा समारोप केला.
     सर्व सदस्य एकमेकांच्या मदतीने व पुढाकाराने सर्व उपक्रम , सर्व जबाबदाऱ्या पार पाडतील अशी हमी आपण सगळे मिळून सौ. मीना ताईंना देऊ या
🙏🙏🙏
    
                        धन्यवाद
                 सौ. भैरवी नाझरकर